fbpx

यवतमाळ–वाशिममध्ये भावना गवळींची हॅट्रीक, माणिकराव ठाकरेंचा पराभव 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे अनेक ठिकाणी विजयी ठरले आहेत. तसेच राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा उमेदवारांचा भाजपयुतीकडून धुव्वा उडवण्यात आला आहे. तर यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार भावना गवळी यांनी विजय मिळवला आहे. जवळजवळ एक लाख मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदार संघातून भाजपकडून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांना शह देण्यासाठी कॉंग्रेसकडून अनुभवी नेते माणिकराव ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अखेर यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने भावना गवळी यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे.

यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार भावना गवळी यांना ५२७१६५  एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार माणिकराव ठाकरे यांना ४१२४२७ मतांवर समाधान मानव लागल आहे. या झालेल्या प्रतिष्ठेच्या लढाईत भावना गवळी यांनी ११४७३८  मतांनी बाजी मारली आहे.