Election- परभणी आणि लातूरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात कौल

लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकेच्या मतमोजणीत परभणी आणि लातूरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिसून येत आहे.
परभणी महापालिकेच्या मतमोजणीमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्षाचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन, भाजपचे सहा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

 

आघाडी घेतलेल्या उमेदवारांमध्येही काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे.
लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३३ उमेदवार आघाडीवर असून त्याखालोखाल २५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस तर लातूरमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. चंद्रपूरमध्ये मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आतापर्यंत २७ उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाला ११, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.