विखे-पाटलांच्या विरोधात त्यांचा सख्खा भाऊ मैदानात ; २० तारखेला करणार उपोषण

radhakrushna vikhe patil

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात त्यांचे मोठे बंधू डॉ. अशोक विखे यांनी बंड पुकारला आहे. अशोक विखे येत्या २० मे पासून विखे-पाटील कुटुंबाच्या विविध संस्थांच्या चौकशीच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू डॉ. अशोक विखे पाटील यांनी विखे-पाटील कुटुंबाच्या विविध संस्थांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. इतकेच नव्हे तर, येत्या २० मे पासून या सर्व मागण्यांसाठी प्रवरानगर मधील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर ते उपोषणाला बसणार आहेत.

डॉ. अशोक विखे-पाटील यांच्या नेमक्या काय आहेत मागण्या ?

  • गणेश, राहुरी, प्रवरानगर, या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळावेत.
  • झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करण्यात यावी.
  • जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराच्या तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई करावी.
  • मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी.Loading…
Loading...