fbpx

महामार्ग समृद्ध करताना शेतक-यांचीही काळजी घेऊ – एकनाथ शिंदे

eknath shinde

नागपूर :  राज्याच्या आर्थिक विकासासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प करत असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वेरूळ गावातील समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि सर्व समस्या सोडवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे समृद्धी महामार्ग प्रकल्पांअंतर्गत नवनगराची देखील (कृषी समृद्धी केंद्र) उभारणी करण्यात येणार असून त्या जागेची पहाणी देखील शिंदे यांनी केली.

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, एमएसआरडीचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड, आर्वीचे प्रांत अधिकारी शर्मा, अधीक्षक अभियंता निकोसे, कार्यकारी अभियंता बोंडे उपस्थित होते. समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे अधिग्रहण वेगाने करा आणि शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित निकाली काढा, असे निर्देश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

2 Comments

Click here to post a comment