Share

CM Eknath Shinde | दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचं ट्विट, म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्या आधी एक ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचं ट्विट :

मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे, प्रसिद्ध लेखक हरिवंशराय बच्चन यांची ही म्हण शेअर केली आहे.

पाहा ट्विट :

शिवसेनाच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकरणात चांगलीच आफडा-तफड माजवली होती. सर्व पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. मात्र, याचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला. त्यामुळे एकनाथ शिंदे गट मोठी गर्दी जमवण्यासाठी खाटापीट करत आहे.

दसरा मेळव्यासाठी बीकेसी मैदानावर येणाऱ्या शिवसैनिकांसाठी तब्बल अडीच लाख फुड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. ठाणयातील प्रशांत काॅर्नर नावाच्या मिठाईच्या दुकानवाल्याला ही ऑर्डर देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून कमीत कमी ३ लाख कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे.बीकेसी मैदानावर मेळावा संपल्यानंतर हे फूड पॅकेट्स दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रशांत कॉर्नरच्या कारखान्यात सध्या फूड पॅकेटस तयार करण्याची लगबग सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now