सुरत (गुजरात) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. त्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढत आहेत, ज्या वाढवण्यात एकनाथ शिंदे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना दणका दिला आहे. काल रात्रीपासून त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. ते अंदाजे १३ आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्वीट केलं आहे.
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे ट्वीट एकानाथ शिंदे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर संपूर्ण महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकारचे तिन्ही पक्ष आता एकापाठोपाठ एक बैठक घेताना दिसत आहेत. तिन्ही पक्षांतर्गत नाराजीचे वृत्त सर्व बाजूंनी येत आहे. विधान परिषद आणि राज्यसभेतील क्रॉस व्होटिंगने तिन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे.
पण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे सर्वांना धक्का दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या पडझडीची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता कार्यकर्ते आणि पदाधिकारीही नॉट रिचेबल आहेत. सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या शहर कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे हेही नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांच्यासह उपशहरप्रमुख गणेश अहिवळे हेही पोहोचलेले नाहीत. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच प्रमुख नेते आणि पदाधिकारीही फोन बंद करून संपर्कापासून दूर आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<