मुंबई : पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणे एनआयए (NIA) आणि ईडी (ED) यांनी अटक केली आहे. यानंतर पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांने इतर ठिकाणी देखील छापेमारी करत अनेकांना अटक केली. या सर्व प्रकारांनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हणजेच अमित शहा यांनी पिएफआयवर ५ वर्षांसाठी भारतात बंदी घातली आहे. मात्र, यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अर्थात विरोधकांनी भूमिका घेतली नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर टोला :
अमित शहांनी (Amit Shaha) पिएफआयवर बंदी घातली, यावेळी मी त्यांच्या निर्णायाचं कौतुक केलं, मात्र तुम्ही याबाब काहीच भूमिका घेतला नाही, का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून तुम्ही भूमिका घेतला नसल्याचा टोला शिंदेंनी लगावला आहे.
बंड करत शिवसेनामध्ये फुट पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पहिला मेळावा आहे. तर शिवसेना पक्षाचा परंपरा असलेला गसरा मेळावा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर घेत आहेत. दोन्ही मैदानांवर एकाच वेळी दसरा मेळावे पार पडत आहेत. यावेळी शिंदेंना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदेंनी गद्दारीचं दिलं स्पष्टीकरण :
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात भाषण देताना शिंदेंनी गद्दारीचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी गद्दारी झाली, झालीच गद्दारी, २०१९ सालीच गद्दारी झाली, जेव्हा महाविकास आघाडी घडली तेव्हाच गद्दारी झाली, असा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी यावेळी केला आहे.
आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरिक्षण करा, असा इशारा देखील शिंदेंनी दिला आहे. आम्ही नाही तर तुम्ही गद्दार आहात, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. तसेच मविआ सोबत गेला तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
बीकेसीवर होत असलेल्या मेळाव्यात भषणापुर्वी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरें प्रमाणेच नतमस्तक झाले. राज्याच्या काना कोपऱ्यातून अनेक लोक येथे आले आहेत, काही लोक कालपासूनच आले आहेत, तर काही पाहटेच बीकेसीवर दाखल झाले, त्यामुळे मला तुमच्या भावा समोर नतमस्तक व्हावं लागलं असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे देखील मंचावर पोहचताच नतमस्तक झाले होते. यावेळी डाॅक्टरांनी परवानगी दिली नसली तरी मी झुकलो आणि झुकल्या शिवाय पुढे जाणारही नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकून सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । देवेंद्रजी, आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुक्कर पाळायची, हे नाही चालणार; ठाकरेंचा इशारा
- Uddhav Thackeray | “अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे गृहमंत्री, ते फक्त…” ; उद्धव ठाकरेंची टीका
- CM Eknath Shinde | “होय! गद्दारी झाली, २०१९ सालीच…”, एकनाथ शिंदे आक्रमक
- Uddhav Thackeray । मी रुग्णालयात होतो तेव्हा कटाप्पा कट करत होते; ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात
- Eknath Shinde | “… म्हणून मला भाषणापुर्वी नतमस्तक व्हावं लागलं”, उद्धव ठाकरें प्रमाणे नतमस्तक झालेल्या एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका