Share

Eknath Shinde | “आता पवार आणि शेलार पॅनल देखील ‘या’ स्पर्धेत उतरले असून…”, एकनाथ शिंदे

Eknath Shinde | मुंबई :  क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या मुंबई येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येस स्नेहभोजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याला राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित होते. या कार्यक्रमाबात एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येस आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व सदस्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बीसीसीआय चे माजी अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुंबईला क्रिकेटची पंढरी असे म्हटले जाते, या पंढरीला एका उंचीवर नेण्याचे काम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्व आजी माजी कार्यकारी मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आता पवार आणि शेलार पॅनल देखील या स्पर्धेत उतरले असून ते नक्कीच या मुंबई क्रिकेट असोसिएशनला एका नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. मुंबईतील ५१ मैदाने, बीकेसी येथील २२ एकर जागेवर क्रिकेट अकादमी सुरू करणे असे प्रश्नदेखील हे पॅनल नक्की सोडवेल असे सांगून या निवडणुकीत त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केलं असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

त्यासोबतच वानखेडे स्टेडियमच्या जागेची लीज वाढवणे, पोलीस सुरक्षेसाठी आकारण्यात आलेली रक्कम माफ करणे या असोसिएशनने केलेल्या मागण्या नक्की पूर्ण केल्या जातील असेही याप्रसंगी स्पष्ट केले. पनवेल जवळील डोलघर येथील ५१ हेक्टरचे मैदान #एमसीए ला देण्याचा विषयही शासनाच्या विचाराधीन असल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आपल्या फेसबुकमध्ये “बीसीसीआय चे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे, अजिंक्य नाईक, शहा आलम, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, प्रताप सरनाईक, एमसीएमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले माजी महिला आणि पुरुष क्रिकेटपटू आणि एमसीएचे सर्व आजी माजी सदस्य याप्रसंगी उपस्थित होते”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई :  क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या मुंबई येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येस स्नेहभोजनाच्या कार्यक्रम आयोजित …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics Sports

Join WhatsApp

Join Now