मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही शिजतंय का? याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत.
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंचा बंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून सुरु आहे का? यासंदर्भात सोशल मिडीयावर चर्चां सुरु असताना पाहायला मिळत आहेत. तसेच माहितीनुसार उद्धव ठाकरे हे शरद पवार यांनाही भेटीसाठी वेळ देत नव्हते. मुख्यमंत्री वेळ देत नसल्यानी शरद पवार देखील या मुद्यावरून नाराज होते.
पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक –
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. आमचे सरकार पाडण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<