Share

Ajit Pawar | एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला झटका! अजित पवारांनी मंजूर केलेला निधी शिंदे-फडणवीस सरकारने रोखला

मुंबई : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या अनेक निर्णयांवर बंदी घालण्यात आली. अशातच पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारकडून 850 कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. पुन्हा एकदा सरकारकडून 850 कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे.

अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का 

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला 850 कोटी रुपयांचा निधीचा वाटप केला होता. हा निधी शिंदे-फडणवीस सरकारने रोखला आहे. 850 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारकडून काही निर्णयांना स्थगिती 

काही दिवसांपुर्वी महाविकास आघाडी सरकार यांच्या काळात गोगरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही योजना आता बंद करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय एकनाथ शिंदे-देवंद्र फडणवीस सरकारला होता.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार आली. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली. तर काही निर्णयांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या अनेक निर्णयांवर बंदी घालण्यात आली. अशातच पुन्हा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now