मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. गेल्या सहा दिवसांपासून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि अपक्ष आमदारांच्या गटासह आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. दाव्यांचे चक्र सुरूच आहे. एकामागून एक विधाने समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
शिंदे गटातील बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही शिवसेना नेत्यांनी केलाय. असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये विलीन होण्यासाठी दबाव टाकला जातोय. मात्र बंडखोर आमदारांनी नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे गुवाहटीतले नेते महाराष्ट्रात आले की खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला कळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. 2019 साली भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली. ही गोष्ट एकनाथ शिंदेना माहित आहे. जर 2019 साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असते. त्यावेळी भाजपने शब्द पळाला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाने बेईमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि आता त्याच भाजपसोबत ते जायला निघाले आहेत, असं संजय राऊत या कार्यक्रात बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<