मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होत असताना आता नवीन सरकार स्थापनेची कसरत जोरात सुरू झाली आहे. काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला. उद्धव ठाकरे यांच्या राजीमान्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.
संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. यानंतर आता थोड्या वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार असल्याचं देखील ते म्हणाले.
दरम्यान, आज राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीन शपथविधी सोहळा होणार आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले होते. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मुंबईत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते राज्यपालांचीही भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईत पोहोचलेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<