Share

Eknath Shinde | “मी शपथ घेतो की…”, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ

Eknath Shinde | मुंबई :  सर्वांचा आवडता दिवाळी (Diwali) सण अवघ्या काही तासांवर आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत प्रदूषण मुक्त दिवाळीची शपथ घेतली आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना देखील प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली आहे.

प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात होत आहे. यावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प पर्यावरण विभागानं केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी शपथ घेत शालेय विद्यार्थांकडून देखील शपथ घेतली आहे.

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येस स्नेहभोजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याला राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित होते. या कार्यक्रमाबात एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

मुंबईला क्रिकेटची पंढरी असे म्हटले जाते, या पंढरीला एका उंचीवर नेण्याचे काम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्व आजी माजी कार्यकारी मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आता पवार आणि शेलार पॅनल देखील या स्पर्धेत उतरले असून ते नक्कीच या मुंबई क्रिकेट असोसिएशनला एका नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. मुंबईतील ५१ मैदाने, बीकेसी येथील २२ एकर जागेवर क्रिकेट अकादमी सुरू करणे असे प्रश्नदेखील हे पॅनल नक्की सोडवेल असे सांगून या निवडणुकीत त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केलं असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई :  सर्वांचा आवडता दिवाळी (Diwali) सण अवघ्या काही तासांवर आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) …

पुढे वाचा

Festival Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now