ठाणे: गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे दाखल झाले. आनंद आश्रमात पोहचल्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले. त्यांनतर त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर अनेक कार्यकर्त्यांचा गराडा होता.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच सध्या राज्यात राज्यात जे सरकार आहे, ते स्थिर आणि योग्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे तो योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<