मुंबई : आज शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. संपुर्ण राज्याचं लक्ष वेधलेल्या हा मेळावा दोन्ही ठिकाणी झाला. एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर टीपा-टिप्पणी केल्या. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला आहे.
एकनाथ शिंदे यांनी सांगितला ‘तो’ किस्सा :
मेळाव्यातील भाषणात शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावं लागेल असं म्हटलं असल्याचा किस्सा सांगितला. यावेळी याच सोफीटेल हाॅटेलमध्ये तुम्ही मला बोलला की पवार साहेब मला मुख्यमंत्री हो म्हणत होते, तेव्हा मी क्षणात हो, मग काय अडचण आहे, असं म्हटलं होतं. त्याच वेळी माझ्या जागी कोणी दुसरा असला असता तर त्याला हार्ट अटॅक आला असता, असं देखील ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचे भाषण वेळेपेक्षा जास्त लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांनी उशीर होत असल्यामुळे सभेतून काढता पाय घेतला. यापूर्वी शिंंदे गटाने परराज्यातून सभेसाठी माणसे आणल्याची चर्चा होती. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा कट्टाप्पा म्हणून उल्लेख केला होता. याला शिंदेंनी प्रत्युत्तर केलं आहे. मी रुग्णालयात असताना कट्टाप्पा कट करत होता, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला होता. यावर कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे :
मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या, ते नाराज होऊन गेले. असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल
- Eknath Shinde | “काँग्रेसचा राक्षस गाडा, राष्ट्रवादी हरामखोर पक्ष…” ; एकनाथ शिंदे गरजले
- Eknath Shinde | “कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेले
- Uddhav Thackeray । महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल