गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या नोटीसीनंतर आता एकनाथ शिंदे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकार विरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत.
तसेच शिंदे यांनी काही वेळापूर्वी दोन ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिंदे ट्विटमध्ये म्हणाले कि, आता मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.. असं ते ट्विटमध्ये म्हणाले. दुसऱ्या ट्विटमध्ये हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू… असं देखील शिंदे म्हणालेत.
दरम्यान, शिंदे गटाने केलेल्या पहिल्या याचिकेत बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाईला आव्हान दिले आहे. यानंतर दुसऱ्या याचिकेत विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद बनविण्यावर आव्हान दिले आहे. यामध्ये विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करण्यात आल्याचा मुद्दा समोर आणण्यात आला आहे. शिंदे गटाने या याचिकेची प्रतही मविआ सरकारला पाठविल्याचे कळते आहे. यामुळे कोर्टाकडून जारी होणाऱ्या नोटीसीचा वेळ वाचू शकेल. या याचिकांवर तात्काळ म्हणजेच उद्या सकाळी साडे दहाला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<