ठाणे: गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण केले. त्यानंतर ते ठाण्यातील आनंद आश्रम येथे दाखल झाले. आनंद आश्रमात पोहचल्यानंतर त्यांनी पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले. त्यांनतर त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर अनेक कार्यकर्त्यांचा गराडा होता.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने आज महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. या दोघांचीही सर्वसामान्यांना न्याय देण्याची शिकवण होती. त्यामुळे राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमचं युतीचं सरकार करेल. तसेच हे सरकार राज्याचा सर्वांगीण विकास देखील करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पुढे मुख्यमंत्री असेही म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशिर्वादामुळेच आज मी मुख्यमंत्री म्हणून बोलत आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेल्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळेच आज ५० आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आमच्या या भूमिकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<