नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी शिवसेनेच्या आरोपांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत आज महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. हा बंड म्हणजे सेनेशी गद्दारी असल्याची टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले कि, “साधा नगरसेवक दुसरीकडे जाताना एकदा विचार करतो हे ४० आमदार तर तीन-चार लाख मतांनी निवडून आलेले आहेत. अडीच वर्षांपूर्वी जी शिवसेना-भाजप युती व्हायची होती ती आज आम्ही केली आहे. ज्या मंत्री मंडळात आम्ही सावरकरांवर बोलू शकत नव्हतो, ज्यांनी मुंबईत अनेक बॉम्ब स्फोट घडवले त्यांच्या विरोधातला हा उठाव आहे. त्यामुळे पक्षाविरोधातील उठाव हा गद्दारी नसून अन्यायाविरोधाची क्रांती आहे.” असे रोखठोक उत्तर शिंदे यांनी दिले आहे.
मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार?-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच जे. पी.नद्दांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असून आषाढी एकादशी झाली कि, आम्ही मुंबईत भेटून याबाबत चर्चा करून आपल्या मनातील प्रश्नाचे उत्तर देऊ. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सरकार घडवण्यामागे मोदी-शाह यांचे सहकार्य-
लोकांच्या मनात असलेलं सरकार आम्ही स्थापन केले आहे. लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सरकार स्थापन करण्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सदिच्छा भेट घेतली असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील घडलेल्या घडामोडींची राज्याने तसेच देशाने नव्हे तर जगाने नोंद घेतली आहे. त्यामुळे आमच्यावर जबाबदारी अजूनच वाढली असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadnavis | “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना” ; देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत मोठे वक्तव्य
- IND vs ENG : दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी ‘असे’ राहील हवामान; खेळपट्टी कशी आहे? वाचा!
- Balasaheb Thorat: “… हा OBC समाजावरील अन्याय आहे”, बाळासाहेब थोरात यांचा आरोप
- Eknath Shinde : मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार?; मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच म्हणाले….
- IND vs ENG : विराट कोहलीला दुसऱ्या टी-२० सामन्यात संघात स्थान नाही; भारताच्या माजी खेळाडूंचं वक्तव्य
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<