Eknath Shinde | नंदुरबार : वेदान्त-फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर टीका केली जातेय तर विरोध सत्ताधाऱ्यांना दोष देत आहेत. नंदूरबारमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या वादाबाबत भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, आज राज्यात टाटा एअरबसवरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरं देईल. भविष्यात या राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
तसेच “देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जे प्रकल्प सुरू करण्यात आले होते. त्यांना गेल्या अडीच वर्षांत स्थगिती देण्यात आली होती. ते प्रकल्प आम्ही सत्तेत आल्यानंतर पुन्हा सुरू केले असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ‘परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही’, अशी टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली होती.
ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देत ते म्हणाले, “आज राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही जी नुकसान भरपाई दिली आहे. ती आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी नुकसान भरपाई आहे. आमच्या मंत्रीमंडळाने नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली आहे. जे शेतकरी निकषात बसत नव्हते, त्या शेतकऱ्यांनाही आम्ही मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सहा हजार कोटींची नुकसान भरपाई दिली. त्यामुळे त्यांनी आकडे पहावे आणि टीका करावी, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Milind Narvekar | … म्हणून मिलींद नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्यात आली, खरं कारण आलं समोर
- Rohit Sharma | “युवराज सिंग माझ्यावर नाराज” ; रोहित शर्मा असं का म्हणाला?
- Anushka Sharma | कोलकत्याच्या काली घाट मंदिराजवळ मुलगी वामिका सोबत दिसली अनुष्का शर्मा
- Aditya Thackeray । “कृषीमंत्र्यांना ‘त्यांच्या’ सोबत बसायचं असतं”, आदित्य ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा
- Gulabrao Patil | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादात गुलाबराव पाटलांची उडी, म्हणाले…
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले