मुंबई : विधान परिषदेची निवडणूक एका दिवसावर आली असताना, शिवसेनेत मात्र अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु काही दिवसापासून सुरु होती, आता शिंदेची ही नाराजी कायम का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. आज शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिन आहे. द वेस्टिन हॉटेलमध्ये आज शिवसेनेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याचा आग्रह कार्यक्रमात केला गेला. मात्र यावेळी त्यांना भाषण करायचे टाळले. शिवेसना नेत्यांनी आग्रह करुनही त्यांनी भाषण केले नाही. यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, काल शिवसेना आमदारांची विधान परिषदेच्या मतदानाची ट्रायल घेण्यात आली, यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येथे उपस्थित असायला हवे, अशी शिंदे यांची भावना होती. पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेना आणि अपक्ष आमदारांची मतदानाची ट्रायल घेण्यात आली होती. त्यावरूनही एकनाथ शिंदे नाराजी असल्याची चर्चा सुरु होती.
अशातच आज त्यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषण करण्यास नकार दर्शिविल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय आता अगदी तोंडावर आले असताना शिवसेनेतील नाराजी सेनेला महागात पडू शकते. मात्र, आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नसून विरोधकांकडून अशा बातम्या पेरल्या जात असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :