समृद्धी महामार्गावरून मनसे-शिवसेना आमने सामने ; एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

ठाणे : समृद्धी महामार्गाचं काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच केलं जात आहे, शेतकऱ्यांच समाधान झाल्याशिवाय आम्ही हे काम पुढे घेऊन जात नाही त्यामुळेच शेतकरी स्वतःहून जमीन देण्यास पुढे येत आहेत. असा दावा सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शनिवारी ठाण्यातल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरुन सरकारवर तोफ डागली होती. आता यावरून एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकार समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना विश्वासात घेत नसून, या महामार्गाच्या आडून वेगळ्या विदर्भाची चूल रचली जात असल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी केला होता. असं होत असेल तर समृद्धी महामार्गाला विरोध करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर एकनाथ शिंदेंनी डोंबिवलीत सरकारची भूमिका मांडली. आता समृद्धी महामार्गावरून मनसे आणि शिवसेना आमने-सामने आल्याच चित्र आहे.