मुंबई : काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभावनामध्ये काल रात्री ७.३० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत शुभेच्छा देखील दिल्या.
मात्र आज प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एक बोचरी टीका फडणवीस यांच्यावर केलीये. काय म्हणालेत संजय राऊत पाहुयात. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र याला संजय राऊत यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवला असे म्हणता येणार नाही कारण मग नारायण राणे यांना मुख्यमंत्री का बनवलं नाही? असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केलाय.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<