पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला; दोन्ही पाय गमावलेल्या रुणालीला मिळाले हक्काचे घर

पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला; दोन्ही पाय गमावलेल्या रुणालीला मिळाले हक्काचे घर

Eknath Shinde and Runali More

ठाणे: ऑगस्ट महिन्यात ठाणे रेल्वे स्थानकावर क्लास शोधत असताना रुणाली मोर (Runali More) (वय १४) हिचा अपघात झाला होता. या अपघातात तिचे दोन्ही पाय जायबंदी झाले होते. तेव्हा तिच्या संपूर्ण उपचाराचा खर्च ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उचलला होता. रुणालीला चालत्या गाडीतील प्रवाशाचा धक्का लागून ती गंभीर जखमी झाली. तिचे दोन्ही पाय या अपघातामध्ये जायबंदी झाले होते. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने शिवसेनेने (Shivsena) मदतीचा हात पुढे केला.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मानपाडा परिसरात राहणारी नववीत शिक्षण घेत असलेली रुणाली क्लासच्या शोधात ठाणे रेल्वे स्थानकात येऊन पोहोचली. स्थानकावरील गर्दी बघून गोंधळून गेलेल्या रुणालीला रेल्वेतील एका प्रवाशाचा धक्का बसला आणि त्यात तिचा मोठा अपघात झाला होता. तिचे स्वप्न डॉक्टर होण्याचे आहे. एवढ्या मोठ्या आपघातातून बाहेर निघण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली.

या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुणाली मोरे हिला आणखी एक मोठी मदत केली आहे. पुन्हा एकदा शब्द पूर्ण केला, असं ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी रुणाली मोरे हिला तिच्या स्वतःचं हक्काचं घर मिळवून दिले आहे. त्या घराची चावी तिला देतानाचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. ठाणे महानगरपालिकेने रुणाली मोरे हिला घर मिळवून देण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या: