Share

Eknath Shinde | “दमदाट्या देऊन ग्रामपंचायत आणायच्या नसतात”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचा नितेश राणेंना सल्ला 

Eknath Shinde | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. यामध्ये आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भर टाकत कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. “माझ्या विचाराचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही”, असं ते म्हणालेत. यावरून आता एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी नितेश राणे यांना सुनावलं आहे.

ते म्हणाले, “नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं करायचं असतं. तर ग्रामपंचयात आपोआप येते. अशा कुणाला दमदाट्या देऊन ग्रामपंचायत आणायच्या नसतात.”

“नितेश राणे यांना मी सांगेन. अशाप्रकारचं बोलू नका. त्यामुळं इतरांना असं वाटतं की, हे धमक्याचं देतात. असं आपल्याबद्दलचं चित्र होता कामा नये. अशी छोटी वक्तव्य त्यांनी करू नये”, असा खोचक सल्ला संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांना दिला.

नितेश राणेंचं वक्तव्य काय?

नितेश राणे म्हणाले, “चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. ऐवढी काळजी मी निश्चितपणे घेईल. त्यामुळे मतदान करताना आता नीट विचार करा, कारण आता निधी वाटप माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी असो, ग्रामविकासचा निधी असो की 25 पंधराचा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो, कारण मी सत्तेत असलेला आमदार आहे.”

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. यामध्ये आता भाजप आमदार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now