Share

Eknath Shinde | “48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार?”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा  शरद पवारांना सवाल 

Eknath Shinde | पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 48 तासांचा अल्टिमेटम देत अन्यथा मी कर्नाटकात जाईल असा इशारा दिल. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी शरद पवार यांच्यासह संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

ते म्हणाले, “48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार?” तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही काय केलं?, असा सवालही त्यांनी यावेळी शरद पवार यांना केला आहे. हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं शिवतारे म्हणालेत. तर संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांनी सामना ऑफीसपासून जवळ असलेल्या पत्राचाळीतील जी घरं रस्त्यावर आलेत त्या मराठी बांधवांची काळजी करावी, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

“कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now