Eknath Shinde | मुंबई : राज्यात अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. अंधारे यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं”, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं. यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही, असं म्हणत त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.आशिष शेलारांचीही जोरदार टीका-
आशिष शेलार म्हणाले, “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे. इथे महाराष्ट्रात कोणीतरी कालपरवाच चर्चेत आलेल्या सुषमाताई अंधारे या वारकरी संप्रदायाचा अपमान करतात? वारकऱ्यांच्या श्रध्देची खिल्ली उडवतात?”
रोहित पवार यांनीही सुनावलं-
“संतांच्या किंवा महापुरुषाच्या बाबतीत चुकीचं विधान करू नये. तसं विधान केल्यास माफी मगितली पाहिजे”, असा सल्ला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे. कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीने संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Vitamin Deficiency | ‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर वाढतात पांढरे डाग
- Sanjay Raut | “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे”; चित्र वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार
- Mercedes Benz Electric Car | मर्सिडीज बेंजने सादर केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार
- Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल; नेमकं प्रकरण काय?
- IND vs BAN | कुलदीपच्या कामगिरीने प्रशिक्षक झाले प्रभावित, म्हणाले…