मुंबई : महिनाभरापासून लटकलेला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊ शकतो. एका वृत्तवाहीनीने सूत्र्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गोटात एकमत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांची मॅरेथॉन बैठक घेतली. सर्वांच्या सहमतीने मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप मध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ३५-६५ असा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे आपल्या आमदारांसोबत वन-टू-वन बैठक घेत होते, त्यात हा समझोता झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून २० मंत्रीपदांची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर भाजपने १५ ते १७ मंत्रीपदे देण्याचे मान्य केले. तर भाजपला २४ ते २५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
नवीन चेहऱ्यांनाही मंत्रिपद मिळाल्याची माहिती-
एकनाथ शिंदे लवकरच दिल्लीत जाणार आहेत. यानंतर मंत्रिमंडळाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होईल. यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या शिंदे गटातील नेत्यांना मंत्रीपद मिळू शकते. काही नवीन चेहऱ्यांनाही मंत्रिपद मिळाल्याची माहिती मिळत आहे. ज्या आमदारांना मंत्रीपद मिळणार नाही, त्यांना महामंडळात अध्यक्षपद दिले जाणार आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात लढत सुरू-
एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनाही राज्यपालांनी शपथ दिली. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. तेव्हापासून शिवसेनेत खरी लढत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाकडे ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता मिळावी यासाठी धाव घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup साठी टीम इंडिया फायनल! रोहित म्हणाला, “काही स्लॉट रिकामे आहेत, पण…”
- Chhagan Bhujbal and Sharad Pawar | OBC आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि छगन भुजबळांची पत्रकार परिषद
- Bengal SSC Scam । …आणि ईडीच्या चौकशीत अर्पिता मुखर्जी ढसाढसा रडू लागली
- IND vs WI T20 : टीम इंडियात दमदार फलंदाजाची अचानक एंट्री, तरीही रोहितला वेस्ट इंडिजची भीती!
- Eknath Shinde’s banner torn | छगन भुजबळांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<