मुंबई : शिवसेनेचे आमदार-खासदार फोडून संपूर्ण पक्ष संघटना ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिंदेसेना शिवसेनेला हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यात त्यांनी आपल्या संघटनेला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी केली. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिंदे गटात आले असले तर तरी एकनाथ शिंदे यांना शिवसेना संघटनेवर नियंत्रण ठेवणे तितके सोपे नाही. मात्र, त्यांनी या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनंतर आता त्यांची नजर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आहे.
शिवसेनेच्या संघटनेत सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रतिनिधी सभागृहात 282 सदस्य आहेत. एकनाथ शिंदे आता यापैकी दोन तृतीयांश म्हणजेच 188 सदस्य बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत. त्यात ते यशस्वी झाले तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अवघड जाणार आहे.
पक्षांतरविरोधी कायद्यानुसार केवळ आमदार आणि खासदारांचे विभाजन म्हणजे पक्षात फूट असा होत नाही. त्यासाठी संघटनेत फूट पडली पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 188 सदस्यसंख्या मिळाल्यास संपूर्ण पक्षात फूट पडण्याचा दावा बळकट होईल. त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या मनसुब्यानुसार संपूर्ण शिवसेनेवर नियंत्रण ठेवू शकतात. शिवसेनेला मात्र हा धोका समजला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यावेळी संघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- County Cricket : चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकावर इंग्लंड फिदा, केलं भव्य स्वागत; पाहा VIDEO!
- Raj Thakrey : राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी गायिका आशाताई ‘शिवतीर्थ’ वर
- Vijay devarkonda | विजय देवरकोंडाच्या ‘लिगर’कडून चाहत्यांना आहे ‘ही’ अपेक्षा; लवकरच होणार रिलीज
- Rupali Patil : चित्रा वाघ यांचं डोके ठिकाणावर आहे का ?; रुपाली पाटलांचा संतप्त सवाल
- Chitra Wagh | मला घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत – चित्रा वाघ
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<