Eknath Shinde | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घएऊन बंड केला. यानंतर महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरुन पायउतार करत भाजप सोबत युती केली आणि सत्तेवर आले. आणि शिंदे गट सत्तेत आले. अशातच नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री का बनवलं यामागचं खरं कारण शिंदेंनी सांगितलं आहे.
ठाण्यात महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हा एक जोरदार आणि धाडसी माणूस दिसतोय असं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वाटलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, सुरूवातीला मुख्यमंत्री कोण होईल अशी चिंता होती. परंतु हा एक जोरदार, धाडसी माणूस दिसतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माझ्याबद्दल वाटले. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, असं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या वतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी…”, शिंदे गटाचा घणाघात
- Uddhav Thackeray | कर्नाटकच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? ; उद्धव ठाकरे यांचा सवाल
- Sanjay Raut | “समर्थन केलं नाही हा खुलासा होत नाही, नामर्दपणा…”, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
- IND vs BAN | वनडे मालिकेमध्ये मोहम्मद शमीच्या जागी खेळणार ‘हा’ गोलंदाज
- Urvashi Rautela | ऋषभ पंतसोबत अफेअरच्या चर्चांना उर्वशीने दिला पूर्णविराम, म्हणाली…