Share

Eknath Shinde | महाराष्ट्रातून प्रकल्प का गेले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

 Eknath Shinde | मुंबई : गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून एकापाठोपाठ प्रकल्प बाहेर चालले आहे. आधी वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) आणि नागपूरमध्ये होणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. या सगळ्यामुळे राज्यातील वातावरण खूपच खराब झालं आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेले प्रकल्प का जात आहेत?, यामगचे कारण सांगितले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आलं आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे बोलत होते.

आम्ही नवे उद्योग आणत असून त्यात राज्याचं हित आहे. यामुळे राज्यातील तरुणांना फायदा होईल, राज्य स्वयंपूर्ण होईल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे. राज्याला केंद्राकडून विकासासाठी निधी मिळत आहे. गेल्यावेळी प्रस्ताव पाठवला असता १४ हजार कोटी मंजूर करण्यात आले. एक रुपयाही कमी केला नाही.

सरकार बदल्यानंतर चैतन्य आलं आहे. सर्व सण साजरे होत असून आनंदाचा शिधाही पोहोचला. पण काही ठिकाणी पोहोचला नाही म्हणून लगेच त्याच्यावर बोट ठेवण्यात आलं. राज्यात एक नकारात्मकपणा होता, त्यात सकारात्मकपणा आणला आहे. आम्ही दोघं असताना धडाधड निर्णय घेतले. हे गतिमान सरकार आहे. वर्षभरात 75 हजार रिक्त पदं भरली जातील. त्याचबरोबर नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, जपानच्या कंपनीने बीकेसीत 2 हजार 67 कोटींमध्ये जागा घेतली आहे. ते 500 कोटी खर्च करणार आहेत. यामधून पाच ते सहा हजार लोकांना नोकऱ्या मिळतील, असं शिंदेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

 Eknath Shinde | मुंबई : गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून एकापाठोपाठ प्रकल्प बाहेर चालले आहे. आधी वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) आणि नागपूरमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now