Eknath Shinde | मुंबई : जूनमध्ये झालेल्या सत्तांतर नंतर विरोधक वारंवार सत्ताधारकांवर टीका करताना पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसोबत बंड केला होता. या ४० आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर आज नंदुरबार येथे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये धाड पडली तेव्हा 27 कोटी रुपयांसाठी टेम्पो लागला. मग 50 कोटींचे ट्रक का दिसले नाही? लोकांची दिशाभूल करू नका, पैशाच्या लालसेपोटी हे 40 आमदार माझ्यासोबत आले नाहीत. या पनान्स लोकांना बदनाम करण्याचं काम तुम्ही कराल तेवढं खड्यात लोक तुम्हाला टाकतील, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
40 आमदार, 10 अपक्ष आमदार यांनी एका भावनेपोटी, राज्याच्या विकासासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यामुळे इथे पैशांचा कुठेही विषय येत नाही, येणारही नाही. माझ्यासोबत सर्व आमदार मनापासून आले. पैशांचं कुठेही देणंघेणं झालं नाही, असं देखील शिंदे म्हणाले.
दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. कडू यांनी रवी राणा यांना त्यांच्या आरोपांचे पुरावे सादर करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला आहे. रवी राणा यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध केले नाहीत तर बच्चू कडू यांनी आपण सात ते आठ आमदारांसह सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane | “एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यावर मविआने टीका करणं म्हणजे…”, नितेश राणेंचा हल्लाबोल
- Weight Lose Tips | वाढते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Eknath Shinde | टाटा-एअरबस प्रकल्प वादावर शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले…
- Skin & Hair Care Tips | कढीपत्ता वापरून चेहरा आणि केसांना होऊ शकतात ‘हे’ फायदे
- Milind Narvekar | … म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्यात आली, खरं कारण आलं समोर