मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गदारोळात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. गुवाहाटीमध्ये सध्या ५० आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते दारूच्या नशेत असल्यासारखे वाटत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये “सत्ता के नशे मे झूम शाबी झूम बराबर” असे लिहिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ स्वराज इंडियाचे नेते आणि वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओ मागची सत्यता जाणून घेणं गरजेच आहे.
Rebel Shiv Sena leader Shinde. Was drunk on power or just drunk? pic.twitter.com/AY1NDBpCjm
— Prashant Bhushan (@pbhushan1) June 25, 2022
काय आहे व्हिडीओमागचं सत्य ?
हा व्हिडीओ २ मिनिटांचा आहे. मात्र यामधील 30 सेकंदांची एक क्लिप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून शिंदे नशेत होते का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र या व्हिडीओ मागचं सत्य वेगळचं आहे. एकनाथ शिंदेंसह इतर आमदार सुरत विमानतळावरून गुवाहाटीला जात असताना माध्यम प्रतिनिधींनी विमानतळावर गर्दी केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि सर्व आमदारांना पोलिसांनी पळवतच नेले होते. प्रतिनिधींनी केलेली गर्दी आणि पोलिसांचा ताफा यामुळे एकनाथ शिंदे यांना व्यवस्थित उभ राहता येत नव्हते. ते नशेत नसून गर्दीमुळे या व्हिडीओमध्ये ते असे दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<