मुंबई : राज्यात आज सकाळपासून मोठ्या घडामोडींना वेळ आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून शिंदेंची मनधरणी सुरु आहे. मात्र आता त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाहीये. तसेच एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांनी 46 आमदार सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला आहे.
एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. ट्विटमध्ये शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्विटमध्ये म्हटलं केलं आहे.
दरम्यान, याआधी मुख्यमंत्र्यांच्या अजय चौधरी यांना गटनेते केल्याच्या निर्णयावर बोलताना शिंदे म्हणाले होते कि, “गटनेतेपदाची झालेली निवड ही अवैध पद्धतीने झाली आहे. सर्व आमदारांना बोलवून बहुमताने गटनेता निवडला जातो. पण बहुमताचा आकडा आमच्या बाजूने आहे. त्यामुळे काल निवडण्यात आलेला गटनेता हा कायदेशीर नाही.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
महत्वाच्या बातम्या :