Eknath Shinde | मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलं असल्याचं दिसून येतं आहे. त्यात निवडणुकांचं (Election) वारंही सगळीकडे घुमू लागलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याचवरूनच महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटावर जोरदार हल्ला केला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वक्तव्य
खोका खोका करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat Election) मोठा धक्का दिला आहे. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है,असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिकमधील 51 सरपंच (Sarpanch) आणि सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं असल्याचं समजतं आहे.
प्रवेश केलेल्या सरपंचांच्या ग्रामपंचायतीसाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना न्याय देणारे हे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून तीन महिन्यांत 72 मोठे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 6 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
तसेच पुढे बोलताना शिंदे असंही म्हणाले की, गेल्या दोन तीन दिवसांत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. निकषात न बसणाऱ्यांचेही पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पेट्रोल, डिझेलचे पैसे कमी करण्याचे धाडस आमच्या सरकारने केले. शिक्षक, महिला, शाळांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. समुद्रात जाणारे पाणी दुष्काळी भागाला वळवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar । माझे सासरे शिंदे होते, म्हणून शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी; पवारांच्या वक्तव्याने शिंदे-फडणवीस खळखळून हसले
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या गटाच्या अडचणी वाढल्या!, ‘या’ बड्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार
- Eknath Shinde । मी, फडणवीस पवार एकत्र आल्यानं काहींची झोप उडू शकते; शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
- Andheri by-election । अंधेरी पोटनिवडणुकीत पटेलांच्या माघारीनंतर लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी? ऑडिओ क्लीप व्हायरल
- Kapil Dev । कपिल देव यांचे सूर्यकुमार यादव आणि भारतीय संघासाठी महत्वपूर्ण विधान