राणे विरुद्ध शिवसेना वाद वाढला;एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली

eknath shinde

मुंबई- भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात चांगलाच टीकेचा सामना रंगलेल्या दिसत आहे. तिन्ही पक्षात एकमत नसल्याने महाविकासआघाडी सरकार ऑक्टोबर नंतर टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडणार असा गौप्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

राणे यांनी वर्तविलेले भाकीत शिवसेनेला चांगलच झोंबले आहे. सध्या काही जणांना काहीच कामधंदा उरलेला नाही म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करीत आहे असा सणसणीत टोला शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते नारायण राणेंवर लगावला आहे.

‘सध्या काही जणांना काहीच काम उरलेला नाही म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं काम करत आहे. यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नारायण राणेंवर पलटवार केला आहे.

शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तसेच तिन्ही पक्ष एकमताने काम करत असल्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे एकनाथ शिदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

कोकणातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा फडणवीसांच्या उपस्थित ‘भाजपा’त प्रवेश

धक्कादायक : भाजपा आमदारासह कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह