Share

Eknath Shinde | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी केलं ‘हे’ ट्विट

मुंबई : काही तासांपूर्वी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना कोणते चिन्ह आणि नाव मिळणार याविषयी निर्णय जाहीर केला. त्यामध्ये ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश आयोगाने दिला आहे. तसेच आयोगाच्या या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपला आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील शेअर केला असल्याचं समजतं आहे.

तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना शुभेच्छा देतो. एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. उद्या चिन्ह दिले जातील. आम्ही जी तीन चिन्ह दिली होती, ती चिन्ह रद्द केली असली, तरी आता उद्या सकाळी चिन्ह दिली जातील आणि त्यातून एक चिन्ह आम्हाला मिळेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

पुढे शिंदेंना ठाकरे गटाला मिळालेल्या चिन्हाबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणले की, त्यांना मिळालेलं चिन्ह आणि त्यांना मिळालेलं नाव याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, तेच योग्य राहील. मशाली अन्यायाविरुद्ध पेटल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील अन्यायाविरुद्ध मशाली पेटवल्या होत्या. आम्ही अन्याय दूर करणारा पक्ष आहे. हा राज्यातील जनतेचा पक्ष आहे. हे जनतेचं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो? हे आम्ही पाहणार आहोत. त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मग शेतकरी कष्टकरी बळीराजा असेल, कामगार, वारकरी, समाजातील सर्व घटक महिला, विद्यार्थी, शिक्षक आदी सर्व समाजातील घटकांच्या जीवनता चांगला बदल कसा होईल, या दिशेने सरकार पावलं टाकत आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : काही तासांपूर्वी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना कोणते चिन्ह आणि नाव मिळणार याविषयी निर्णय जाहीर केला. त्यामध्ये ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now