Eknath Shinde | मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही मनसेने शिवाजीपार्कवर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. परंतू या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं एकाचवेळीसोबत असल्यामुळे, आगामी निवडणुका नसे-भाजप-शिंदे गट युती होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
दीपोत्सवानिमित्त राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं. दिवाळीचा सण राज्यात आनंदात साजरा होतोय. आम्ही दीपोत्सवात उपस्थित राहिलो होतो, तेव्हा कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. सण उत्सवाबाबत आम्ही बोललो होतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी रविवारी ( 23 ऑक्टोंबर ) डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला भेट दिली होती. श्रीकांत शिंदे हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे विरोधक मानले जातात. परंतू त्यांनी डोंबिवली कार्यालयाला भेट दिल्याने युतीच्या चर्चेला आणखीन उधाण आलं होतं.
त्यावर मनसे पक्षाचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले होते की, आमची तयारी सुरु आहे. मात्र, राज ठाकरे त्यांनी सांगितलं भविष्यात युती करायची, त्यालाही आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळली आहेत, बाकी सर्वही जुळून येईल.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | “पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान फक्त साहेबच करू शकतात”, शरद पवार स्वतः ऊभे राहिले व त्यांना सन्मानाने बसवलं
- Soler Eclipse | आज वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा ‘या’ राशीवर होणार आहे सर्वाधिक प्रभाव
- Chandrakant Patil | “उद्धव ठाकरेंनी स्वत:चं हसं करून घेतलं!”; चंद्रकांत पाटलांची टीका
- Chandrakant Patil | “उद्धव ठाकरेंचं गणित बहुतेक कच्चं आहे, आता ते…”, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Vicky Koushal & Katrina Kaif | पहिल्या दिवाळी निमीत्त विकी कौशलने कतरीनाला म्हटलं ‘घरची लक्ष्मी’ अन्…; पाहा विकी – कतरीनाची दिवाळी