Share

Eknath Shinde | “…ही आमच्यासाठी एक दु:खद घटना, हा आमच्यावरचा खऱ्या अर्थाने अन्याय”

मुंबई : काल रात्री निवडणूक आयोगाने कोणत्या गटाला कोणतं नाव आणि कोणतं चिन्ह मिळणार याबाबत निर्णय जाहीर केला. त्यानूसार उद्धव ठाकरे गटला  ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश आयोगाने दिला आहे. यावरून मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

अंधेरी पोटनिवडणूक आम्ही युती म्हणून लढवणार आहोत. निवडणूक आयोगाकडे आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह मागितलं होतं, परंतु ते मिळालेलं नाही. ही आमच्यासाठी एक दु:खद घटना आहे, असं म्हणत एखनाथ शिंदे यांनी आयोगाच्या चिन्ह न देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, शेवटी मेरीटवर आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय जर पाहिले तर ज्या पक्षाकडे बहुमत असतं. ज्यापक्षाकडे विधीमंडळात बहुमत आणि संघटनात्मक बहुमत असतं त्याला चिन्ह मिळतं. कारण, चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आमच्याकडे विधानसभा, लोकसभेत जवळपास 70 टक्के बहुमत आहे. 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतांची आकडेवारीही आमच्याकडे होती.

हजारो, शेकडो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य, कार्यकर्ते सगळे आमच्याकडे आहेत, त्यांनी समर्थन दिलं आहे. किंबहूना या देशातील १४ राज्य प्रमुखांनीही त्यांच्या राज्यातील शिवसेनेचं समर्थनही आम्हाला दिलं. असं भरोघोस पाठिंबा आणि समर्थन आमच्याकडे म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असताना, हे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळालं नाही. हा आमच्यावरचा खऱ्या अर्थाने अन्याय आहे. म्हणून याबाबतही आमचा प्रयत्न आहे की मेरीटवर आधारित तुम्ही यापूर्वी जे काही निर्णय घेतले, तेच मेरीट आमच्या प्रकरणात लावलं पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसेच, ठाकरे गटाकडून ज्या टीका करण्यात आल्या, त्यावर शिंदेंना विचरण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, आम्ही आमचं काम करतोय, प्रत्येक टीकेचं उत्तर देण्याची आवश्यकता मला नाही. आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी यासाठी सक्षम आहेत.तसेच आज शिंदे गट 10 वाजेपर्यंत नवीन चिन्ह देणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : काल रात्री निवडणूक आयोगाने कोणत्या गटाला कोणतं नाव आणि कोणतं चिन्ह मिळणार याबाबत निर्णय जाहीर केला. त्यानूसार उद्धव ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics