Share

Eknath Shinde | धनुष्यबाणानंतर ठाकरेंच्या ‘या’ चिन्हांवर देखील शिंदे गटाचा दावा

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुका तोंडावर असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचा धनुष्यबाण चिन्ह गोठवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच निवडणूक आयोगाने (निवडणूक आयोग) नवीन नाव आणि चिन्ह नोंदवण्यासाठी एक दिवसाचा वेळ दिला होता. यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची चिन्ह आणि नावं जाहीर केली. याती काही चिन्हांवर एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांनी नोंदवलेल्या चिन्हांवर दावा –

उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं उद्धव ठाकरे यांच्याकडून ठरवण्यात आली आहे. तसेच, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, ही नावं देण्यात आली आहे. याबाबतची माहिती अरविंद सावंत यांनी दिली होती. अशातच एकना शिंदेंनी देखील उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केलाय.

एकनाथ शिंदेंनी दोन चिन्हांवर दावा केल्याने त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम केलं आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारक यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुका तोंडावर असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचा धनुष्यबाण चिन्ह गोठवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now