Share

Eknath Shinde | मतदार म्हणून जे वाटतं ते तुम्ही केलं नाही तर आम्ही काय करायचं?, नाना पाटेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

मुंबई : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न विचारले. त्यावेळी नानांनी ‘मतदार म्हणून जे वाटतं ते तुम्ही केलं नाही तर आम्ही काय करायचं ते सांगा. पाच वर्षानंतर आम्ही करुच पण त्या आधी काय करायचं?’, असा थेट सवाल केला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

नानांनी भावना व्यक्त केल्या ते अगदी योग्य आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वी मतदारांचा आदर करुन जे काही करायचं ते केलं. जो आदर 2019 मध्ये व्हायला हवा होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही शिवसेना-भाजपा युती म्हणून लढलो. मतदारांनी बहुमत दिलं. भाजपाचे 100 च्या वर आले आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं की बहुतमाप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्देवाने तसं झालं नाही. पण आम्ही ते तीन महिन्यांपूर्वी केलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदेंनी उत्तर दिल्यावर नानांनी त्यांच्या उत्तरावर ‘रागावू नका पण अडीच वर्ष का लागली?’ असा आणखीन एक प्रश्न केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अडीच वर्ष म्हणजे त्यासाठी योग, वेळ, काळ पाहिजे ना? मध्ये कोव्हिड होता. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो असतो तर कोव्हिड असताना का करताय वगैरे मुद्दे उपस्थित राहिले होते. आम्ही त्यांना सांगत होतो, समजावण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र आम्हाला यश आलं नाही. म्हणून तुमच्या मतांचा आदर आम्ही तीन महिन्यांपूर्वी केला .

देवेंद्र फडणवीसांनीही दिले उत्तर

तसेच, याच प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिले. नाना, कोव्हिड होता आणि सरकार फेसबुक लाइव्हवर तर बनवता येत नाही. त्यामुळे जसा कोव्हिड संपला तसे आम्ही एकत्र आलो आणि फिजिकल सरकार बनवलं,असं म्हणत शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वसामान्य नागरिकांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now