कोकणातील लोकसभा मतदार संघांची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्य पातळीवर आणि देश पातळीवर २०१९ च्या लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. त्याचबरोबर शिवसेनेनं महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत विभागप्रमुखांपाठोपाठ आता संपर्क नेतेही बदलले जात आहेत. कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणतल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती. मात्र आता त्यांचे पक्ष छाटण्यात आल्याची चर्चा शिवसेनेत आहे. यापुढेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून अनेक महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी एकनाथ शिंदे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम खातं आहे. तर पूर्वी संपूर्ण कोकणची जबाबदारी असणाऱ्या सुभाष देसाईंकडे आता फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी राहील. सुभाष देसाई, रामदास कदम आणि सुनिल प्रभू यांच्या तक्रारींनंतर कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना विभागप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. अडसूळ विभाग दोनचे विभागप्रमुख होते. यामध्ये कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हा परिसर येतो. अडसूळ यांना हटवून त्यांच्या जागी सुधाकर सुर्वे यांना संधी देण्यात आली आहे. अश्या पद्धतीन शिवसेना नेतृत्वाकडून मुंबईतल्या विभागप्रमुखांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

जळगावात कमळ फुललं,शिवसेनेचा दारूण पराभव तर आघाडीच्या पदरी भोपळा

 

…तेव्हा आम्ही सत्तेला लाथ मारू – शिवसेना