Share

Eknath Khadse | “रश्मी शुक्ला जेव्हा फडणवीसांना भेटल्या तेव्हाच त्यांना…”, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत असलेल्या वरिष्ठ पोलीस आधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट मिळाली आहे. क्लिन चिट मिळण्यापुर्वी त्या मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला सागर बंगल्यावर गेल्या होत्या. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ खडसे यांचा रश्मी शुक्ला यांच्याबाबत गौप्यस्फोट –

ज्या दिवशी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं आणि त्याचप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला, हे कारण मला अद्यापही कळले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू, अशा धमक्या –

अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो, त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया, यासह इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू, अशा धमक्या देण्यात आल्या, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती, तसेच स्वतः पोलिसांनी संरक्षणसुद्धा दिले होते, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. मात्र, हे संरक्षण पोलिसांनी अचानक काढून घेतल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.

दरम्यान, जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी खडसेंची मागणी होती. यासाठी ते जळगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. त्यामुळे तब्बल १२ तास खडसेंनी तिथं ठिय्या केला.

यादरम्यान, पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, तर काय करायचं?, असा सवाल यावेळी एकनाथ खडसेंनी केला आहे. चोरी झाली म्हणून तुम्ही पोलिसांकडे गेलात आणि पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, पोलीसच जर असं वागत असतील तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळणार?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत असलेल्या वरिष्ठ पोलीस आधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट मिळाली आहे. क्लिन चिट मिळण्यापुर्वी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now