एकनाथ खडसे यांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे . सरकारकडे माहिती मागितली तरी मिळत नसल्याचं खडसेंचं म्हणणं आहे गेल्या अधिवेशनात खडसेंनी काही प्रकरणांची माहिती मागितली होती.मात्र माहिती अद्याप न मिळाल्यान खडसे चांगलेच संतापल्याच चित्र पहायला मिळालं
जी माहिती मागितली, त्याप्रकरणात घोटाळा आहे, म्हणूनच ही माहिती लपवली जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. विशेष म्हणजे माहिती देण्याच सरकारने मान्य देखील केल होत मात्र हे आश्वासन हवेतच विरल्याच चित्र खडसेंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल . खडसेंनी केलेल्या या आरोपांमुळे विरोधकांना देखील आयताच मुद्दा मिळाला. हाच का सरकारचा पारदर्शकपणा असा सवाल यावेळी विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर वार करण्याची संधी सोडली नाही.