पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी सरकारला खडसावले

मुंबई: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला पुन्हा एकदा घराचा आहेर दिला आहे. भोसरी एमआयडीची जमीन खरेदीवरुन झालेल्या आरोपांचं सत्य काय, ते स्पष्ट करावे, असं म्हणत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा सरकारला खडसावलं आहे. आज विधानसभेत एकनाथ खडसेंनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

भोसरी एमआयडीमध्ये जावयाच्या नावावर स्वस्तात जमीन खरेदी करुन पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर आहे. याप्रकरणी एक सदस्यीय झोटिंग समितीही नेमली मात्र त्याचा अहवाल अद्यापही सरकारनं सादर केला नाही. या प्रकरणात यापुर्वीही खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली होती.

काय होते प्रकरण ? 

भोसरी इथे एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन कोटय़वधी रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी पदाचा दुरुपयोग करून केवळ ३ कोटी ७५ लाख रुपयांमध्ये माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी जावयाच्या नावावर खरेदी केली. या प्रकरणी त्यांच्याविरोधात पुण्यातले बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी तक्रार दाखल केली होती.

You might also like
Comments
Loading...