एकनाथ खडसेंचा भाजपसाठी प्रचार नाहीच, हे आहे कारण

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे स्टार प्रचारक एकनाथ खडसे आता राज्यातील शेवटच्या टप्यातील लोकसभा मतदारसंघात प्रचार करण्याची शक्यता मावळली आहे, खडसे यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, तसेच ते पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल होणार आहेत.

Loading...

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे मागील तीन वर्षापासून राजकीय वर्तुळातून बाहेर आहेत, भोसरी भूखंड प्रकरणात त्यांना मंत्रीपद देखील गमवावे लागले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते सक्रीय राजकारण पुन्हा सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाता होती. मात्र शस्त्रक्रिया झाल्याने ते रक्षा खडसे यांची उमेदवारी दाखल करताना देखील उपस्थित नव्हते.

राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम होणार नाही, मनसेपेक्षा लोकांचा मोदींवर विश्वास

एकनाथ खडसे यांनी मंगळवारी मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम होणार नाही, मनसेपेक्षा लोकांचा मोदींच्या कामावर विश्वास असल्याचं सांगितले होते. राज ठाकरे हे २०१४ ला वेगळ बोलत होते, आज वेगळ बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करण्यासाठी लोक बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेतLoading…


Loading…

Loading...