भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या चरणी

जळगाव: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर नाराजी आहे. आणि मध्यंतरी त्यांनी अनेक व्यासपीठावर नाराजी व्यक्त केली होती. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडसे यांनी भाजपला चांगलाच घरचा आहेर दिला. सध्या चर्चेत असलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळा खडसेनीच समोर आणला. त्यामुळे त्यांची भाजपवरील नाराजी स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार या चर्चेला वेग आले होते. आता पुन्हा या चर्चेल राजकीय वर्तुळात उधान आलं आहे.

एकनाथ खडसे यांनी जळगावात जैन हिल्सवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. याचवेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनीही शरद पवारांना झुकुन नमस्कार केल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवेशव्दारावर खडसे नतमस्तक झाल्याची चर्चा आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर देखील खडसेंनी पवार यांची भेट घेतली. याच मंचावरून दोन वर्षांपूर्वी महसूलमंत्री असताना खडसेंनी आपण शरद पवार यांचे चाहते असल्याचे विधान केले होते.

भोसरी एमआयडीसी प्रकरणावरून ४ जून २०१६ पासून मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांना नुकतीच क्लीन चिट दिली. मात्र खडसेन बाबत मुख्यमंत्र्यांनी अजून काहीच निर्णय घेतला नाही. तसेच एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी जळगाव दौरा टाळल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

या कार्यक्रमात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा ,नवीन आणि पारंपरिक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह जिल्ह्यातील आमदार-खासदार उपस्थित होते. दरम्यान, एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

You might also like
Comments
Loading...