पक्षासाठी संघर्ष करणारे सत्तेबाहेर आणि नारायण राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत – खडसे

टीम महाराष्ट्र देशा: पक्ष वाढीसाठी ज्यांनी आपल आयुष्य घालवल या संघर्षामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली, मात्र असे नेते आता सत्ते बाहेर आणि नारायण राणे यांच्यासारखे ‘त्यागी’ नेत्यांना पक्षामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याच म्हणत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

bagdure

सोमवारी धुळ्यामध्ये मदनलाल मिश्रा यांच्या ‘आणीबाणी- चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल यावेळी बोलताना खडसे यांनी आपली खंत व्यक्त करतानाच भाजपवर निशाना साधला आहे. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मुलभूत हक्कासाठी अनेकांनी संघर्ष केला. त्यामुळेच आज केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. मात्र आत्ताच्या पिढीला हा इतिहास माहित नाही, अनेक आमदार आणि खासदारांनाही याची माहिती नाही. त्यामुळे आमदार- खासदारांचे विशेष वर्गही घ्यावे लागतील, असेही खडसे यांनी म्हंटले आहे.

 

You might also like
Comments
Loading...