Share

Eknath Khadse | मला जर इतका संघर्ष करावा लागत असेल तर सर्वसामान्यांना किती संघर्ष असेल – एकनाथ खडसे

मुंबई : जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी खडसेंची मागणी होती. यासाठी ते जळगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. त्यामुळे तब्बल १२ तास खडसेंनी तिथं ठिय्या केला.

पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, तर काय करायचं?, असा सवाल यावेळी एकनाथ खडसेंनी केला आहे. चोरी झाली म्हणून तुम्ही पोलिसांकडे गेलात आणि पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, पोलीसच जर असं वागत असतील तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळणार?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

पोलिसांनी तक्रार नोंदवायला टाळाटाळ केल्याने खडसेंनी तब्बल १२ तास पोलीस ठाण्या बाहेर ठिय्या केला. कायदा सुव्यवस्था खरंच जिवंत आहे का, असा प्रश्नही देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now