टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या त्या पोस्ट वरून राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा सुरु झाली आहे. त्यात आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे, ऍड.रोहिणी खडसे यांचा पराभव झालेला नाही, पक्षातर्गंत कारवाया करून त्यांना पाडण्यात आले आहे, असे खडसे म्हणाले आहेत. दैनिक सकाळ या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
ते म्हणाले की, पंकजा मुंडे, ऍड.रोहिणी खडसे यांचा पराभव झालेला नाही, पक्षातर्गंत कारवाया करून त्यांना पाडण्यात आले आहे. ज्यांनी अंतर्गत हे कारस्थान केले आहे. त्यांची नावे आम्ही पक्षाकडे दिलेली आहेत, मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडेसह राज्यात अनेक जण अस्वस्थ आहेत. 12 डिसेंबरला काय निर्णय होणार ? याची प्रतिक्षा करा. आपणही गोपीनाथ गडावर जाणार आहे, असेही खडसे म्हणाले.
दरम्यान पंकजा मुंडे या भाजप पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचे भाजपकडून खंडन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विशेष पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे भाजप सोडणार नसून त्या पक्षातचं राहणार आहेत, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे मुंडे पक्षांतर करणार असल्याच्या केवळ अफवा आहेत, असे पाटील म्हणाले आहेत. तर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही पंकजा मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केले होते. पंकजा मुंडेच काय तर राज्यातील अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे. पंकजा मुंडेंचा निर्णय 12 तारखेलाचं कळेलही असेही ते म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
पंकजा मुंडेंचा गेम भाजप नेत्यांनीचं केला, ‘या’ ज्येष्ठ नेत्याने केला घणाघाती आरोप https://t.co/6vjv0uuQBk via @Maha_Desha
— Maharashtra Desha (@Maha_Desha) December 2, 2019
‘पंकजा मुंडे शिवसेनेत येत असतील तर मी त्यांचे आनंदाने स्वागत करेल’ https://t.co/H630dmEnXs @Pankajamunde @DrPritamMunde @ShivSena @uddhavthackeray @Chh_Udayanraje @ChDadaPatil @Avadhutwaghbjp @RupaliChakanka3
— Maharashtra Desha (@Maha_Desha) December 2, 2019
मराठवाड्यातील "या" प्रकल्पाचे अजित पवार करणार उद्घाटन https://t.co/pwHFWvAoc9 @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— Maharashtra Desha (@Maha_Desha) December 2, 2019