fbpx

तुळजापूर मतदारसंघात विधानसभेला नक्की कमळ खुलणार : एकनाथ खडसे

तुळजापूर- येत्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघ जर भाजपच्या वाट्याला आला तर भाजप आमदार निश्चित पणे निवडून येईल , असा विश्वास भाजप नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी व्यक्त केला. तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता खडसे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी खडसे म्हणाले की, भाजप-सेना युतीकरुन मागील वेळेस विधानसभा निवडणूक लढले. त्यावेळी ही जागा भाजपा कडे होती. येथे विद्यमान सहकार मंञी सुभाष देशमुख लढुन थोडक्या मताने पराभूत झाले होते. मात्र आता भाजपाला तुळजापूर तालुक्यात पोषक वातावरण आहे. येथे भाजपा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल. तसेच पक्षाचे जेष्ठ नेते आणि पदाधिकारी एकत्र बसुन उमेदवार कुणाला द्यायाचा याचा निर्णय घेतील, असे खडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी गुरुवारी तिर्थक्षेञ तुळजापूरला येऊन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तर आषाढी वारीसाठी तिर्थक्षेञ पंढरपूरला रवाना झाले. या वेळी होमकुंडासमोर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने कवड्याची माळ घालुन खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस गुलचंद व्यवहारे, तुळजापूर विकास प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, विकास मलबा, भाजयुवा मोर्चा शहराध्यक्ष प्रसाद पानपुडे, सचिन अमृतराव, भाजपा मिडीया विभाग जिल्हाउपाध्यक्ष संजय खुरुद, इंद्रजीत सांळुके, अदि उपस्थितीत होते.